Homeराज्यपुणेसुनील शेळके यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता - अभिजीत आपटे

सुनील शेळके यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता – अभिजीत आपटे

जोमदार डेस्क/ प्रतिनिधी
मावळ : मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांची प्रशासकीय कामकाजावरील पकड पाहता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांचा अभ्यास आणि जाणीव पाहता भविष्यात महाराष्ट्राच्या प्रशासकीय कामकाजावर अंकुश ठेवण्याची क्षमता दिसून येते.
म्हणजे एका भावी मुख्यमंत्र्याच्या अंगी कोणते गुण असावेत तर ज्याला जनतेच्या प्रश्नांची जाण आहे, ज्याला जनतेच्या दुःखाची जाणीव आहे, तळमळ आहे, जो अभ्यासू आहे आणि ज्याची प्रशासनावर मजबूत पकड आहे. एकट्याने विरोधकांना अंगावर घेण्याची ज्याची ताकद असते तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. आणि मावळच्या जनतेचं हे भाग्य आहे की हे सर्व गुण सुनील आण्णा शेळके यांच्यामध्ये दिसून येतात. आता मावळच्या जनतेने ठरवायचं आहे की मावळ मधून फक्त एक आमदार निवडून द्यायचा की भावी मुख्यमंत्री मावळ तालुक्याला मिळवून द्यायचा. म्हणजे मावळच्या जनतेने ठरवलं तर हे निश्चितच होऊ शकतं. आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेत मावळचे जे आढळ स्थान आहे या मावळच्या शिरपेचात मुख्यमंत्रीपदाचा मानाचा तुरा खोवला जाऊ शकतो तो केवळ आणि केवळ मावळच्या मतदारांमुळे जे कार्यक्षमतेला आणि केलेल्या कामाला पसंती देतील.

त्यामुळे मावळची जनता फक्त आमदार निवडणार की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असे विश्लेषण अनेक विश्लेषक करत आहेत कारण सुनील आण्णा शेळके हे केवळ मावळ पुरते मर्यादित राहिले नसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यसम्राट म्हणून ओळखले जातात त्यामुळे अनेक पत्रकार संपादक राजकीय विश्लेषक हे सुनील आण्णा शेळके यांच्यावर आपले अंदाज बांधत आहेत. निश्चितच मावळची जनता कार्यसम्राट मुख्यमंत्री निवडून देण्यात मागे पडणार नाही असा विश्वास राजकीय तज्ञांना वाटतो.

RELATED ARTICLES

Most Popular

Call Now Button