विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसादात
या महोत्सवाचे प्रास्ताविक प्रा.गणेश करे-पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्रा.विष्णु शिंदे सरांनी केले आणि कल्याणराव सांळुखे सरांनी उपस्थितांचे आभार मानले तर डाॅ.रोहन पाटील यांनी विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले.
जोमदार डेस्क /अविनाश जोशी
करमाळा : यशकल्याणी परिवाराचे संकल्पक श्रद्धेय श्री.वसंतराव दिवेकर साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त व डाॅ.प्रदिपकुमार जाधव पाटील यांच्या स्मरणार्थ वसंत वकृत्व स्पर्धा व यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. आजचे विद्यार्थी स्मार्ट असून त्यांच्यातील सुप्तकलागुणांना व्यासपीठ मिळाले तर त्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढेल या हेतूने यशकल्याणी संस्था दरवर्षी वसंत बालमहोत्सवाचे आयोजन करते.यावर्षीचा वसंत बालमहोत्सव हजारो बालवक्त्यांच्या अत्यंत उत्साही सहभागाने यशस्वी झाला त्यामुळेच या उपक्रमाचा हेतू सफल झाला याचा आनंद संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व प्रोत्साहन देण्यासाठी यशकल्याणी परिवार सदैव तत्पर असतो असे त्यांनी सांगितले.यावर्षी या महोत्सवात प्रसिद्ध सर्पदंश तज्ञ स्व.डाॅ.प्रदिपकुमार जाधव पाटील,उद्यान पंडीत पुरस्काराचे मानकरी आणि आवळा शेतीचे जाणकार श्री.बाळासाहेब काळे पाटील ,पाॅलीहाऊस शेतीचे प्रणेते श्री.राहुल मोरे,गोयगाव शाळेचे आदर्श शिक्षक शिवाजी येडे,शालेय परिपाठ या पुस्तकाचे लेखक प्रा.अजितकुमार कणसे,आदर्श शिक्षक सुरेश शिंदे सर,पक्षीमित्र कल्याणराव साळुंके,करमाळा वकील संघाचे अध्यक्ष अॅड रविंद्र बरडे,सामाजिक कार्यकर्त्या प्रियांकाताई गायकवाड,डाॅ.निलेश मोटे,प्रा.विष्णु शिंदे,कु.अनन्या पवार हिने कळसुबाई शिखर सहाव्या वर्षी सर केल्याने तिला व मान्यवरांना विशेष सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यशकल्याणी समाजरत्न पुरस्कार व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ.डाॅ.प्रचिती पुंडे यांनी वक्तृत्व कला जोपासण्यासाठी आरोग्य,आत्मविश्वास,अभिनय आणि वाचनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध लेखिका डाॅ.सुनिता दोशी यांनी वक्ता म्हणून सभा गाजवण्यासाठी समयसूचकता हजरजबाबीपणा,विषयाचे सखोल ज्ञान, भाषेचे उच्चार आदि बाबींवर विचार मांडले.तर अध्यक्ष म्हणून प्रा.बाळकृष्ण लावंड सर यांनी पालकांचे अभिनंदन करून सहभागी स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन संस्थेचे कौतुक केले व पुढील आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या.या महोत्सवासाठी करमाळा तालुक्यातील विद्यार्थी,पालक व शिक्षक बहुसंख्यने उपस्थित होते.
.