MRTS परीक्षा ही विद्यार्थ्यांच्यातील रियल टॅलेंट शोधणारी परीक्षा…प्रा.गणेश करे पाटील
सहसंपादक (अविनाश जोशी)
स्वयंम संस्कार केंद्र आयोजित महाराष्ट्र रियल टॅलेंट सर्च MRTS परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था,करमाळा येथे आयोजित करण्यात आला. MRTS परीक्षा ही राज्यस्तरीय असून शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या एकूण 820 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
प्रत्येक वर्गाचे पहिले तीन क्रमांक असे एकूण 25 विद्यार्थ्यांना स्वयंम संस्कार केंद्राकडून ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे पाटील यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
राज्यस्तरीय MRTS परीक्षेत
इयत्ता पहिली
कु.तन्मयी अरुण चोपडे (प्रथम क्रमांक)
संकल्प नामदेव जगताप (प्रथम क्रमांक)
सार्थक नागेश सालगुडे (द्वितीय क्रमांक)
कु.राजमुद्रा अंकुश सुरवसे (द्वितीय क्रमांक)
कु.मनवा रविंद्र उकिरडे (तृतीय क्रमांक)
कु.आराध्या अतुल फंड (तृतीय क्रमांक)
कु.श्रावणी रामेश्वर खराडे (तृतीय क्रमांक)
इयत्ता दुसरी
शर्विल प्रदीप मस्कर (प्रथम क्रमांक)
शिवदत्त बिभीषण मस्कर (प्रथम क्रमांक)
विहान महेश देवी (प्रथम क्रमांक)
संस्कार उत्तम विटुकडे (प्रथम क्रमांक)
कु.आदिशा समेद दोशी (द्वितीय क्रमांक)
कु.ओवी अभिजीत पिसे (तृतीय क्रमांक)
कु.श्रावणी महेश अभंग (तृतीय क्रमांक)
हर्षवर्धन यशवंत राऊत (तृतीय क्रमांक)
आर्यन विष्णु गीते (तृतीय क्रमांक)
श्लोकराज शशिकांत शेजुळ (तृतीय क्रमांक)
इयत्ता तिसरी
कु.अनन्या अतुल शिंदे (प्रथम क्रमांक)
प्रणिल अनिल वैद्य (प्रथम क्रमांक)
सुयश दयानंद चौधरी (तृतीय क्रमांक)
प्रतीक महेश होनकळसे (तृतीय क्रमांक)
इयत्ता चौथी
कु.रुषिका गणेश माने (प्रथम क्रमांक)
आदित्य जयंत भांगे (प्रथम क्रमांक)
कु.श्रेया श्रीकांत दरगुडे (द्वितीय क्रमांक)
कु.आरोही शैलेश खळदकर (तृतीय क्रमांक)
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य. मिलिंद फंड सर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन गणेश करे पाटील तर प्रमुख उपस्थितीत, नगर परिषद करमाळा मुलींची शाळा नं.1 चे. मुख्याध्यापक श्री.दयानंद चौधरी, नगर परिषद करमाळा मुलांची शाळा नं.1 च्या मुख्याध्यापिका सौ.सुनंदा माने, डॉ.वर्षा करंजकर, सूरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य नरारे सर, प्रसिद्ध व्याख्याते प्रा.श्रीकांत दरगुडे तसेच मोठ्या संख्येने पालक ही उपस्थित होते.
उपस्थित सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मा.गणेश भाऊ करे पाटील यांनी मार्गदर्शन करताना MRTS ही परीक्षा विद्यार्थ्यांमधील रियल टॅलेंट शोधणारी परीक्षा आहे म्हणुनच परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यश कल्याणी कायम प्रयत्नशील असेल असे मत व्यक्त केले.
मुख्याध्यापक मा.दयानंद चौधरी यांनी परीक्षेचे कौतुक करीत परीक्षेला कायम सहकार्य असल्याचे सांगितले. मुख्याध्यापिका सौ.सुनंदा माने यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व पालकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य.मिलिंद फंड सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषांतून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार महत्वाचे असल्याचे सांगितले. प्रसंगी डॉ.करंजकर मॅडम, प्राचार्य नरारे सर, प्रा.दरगुडे सर यांनी ही मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुथा अबॅकस अकॅडमीच्या अध्यक्षा सौ.ज्योती मुथा यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन स्वयंम संस्कार केंद्राचे संस्थापक अध्यक्ष. प्रा.उत्तम विटुकडे व डॉ.सौ.सारिका विटुकडे यांनी केले होते.