भरला जंगी कुस्तीचा आखाडा, कुस्ती प्रेमींना पर्वणी
जोमदार डेस्क/अविनाश जोशी
करमाळा : करमाळा तालुक्यातील पांडे येथील ग्राम दैवत जगदंबा देवीची कोजागिरी पौर्णिमे निमित्त जगदंबा देवीची यात्रा ऊसाहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यात्रे दिवसी पहाटे मान्यवरांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. दिवसभर भक्तांनी नैवेद्य नारळ तोरण व नवसांची शेरणी घेऊन देवी ची पूजा केली. संध्याकाळी पाच वाजता भर पाऊसात राजेंद्र कोल्हे व भगवान दुधे या भक्तांनी दोन वेळा बारा गाड्या ओढण्यात आल्या
तसेच रात्री बारा वाजता जगदंबा देवी चा छबीना प्रमुख चौकातुन काढण्यात आला आराधी मंडळी, हालकी पथक, सनई सुर, साईबाॅजो सह छबीना मिरवणुक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली
यात्रेनिमित्त मिठाई स्टॉल, खेळणी स्टॉल तसेच लहान मुलांचे पाळणे लावण्यात आले होते. मंदीर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
रात्री मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दुसर्या दिवसी जंगी कुस्तीचा आखाडा भरवण्यात आला होता.या आखाडा साठी पंचकृषीतील तसेच तालुक्यातील पैलवानांनी हजेरी लावली होती यावेळी सभापती आतुल पाटील, उपमहाराष्ट्र केसरी आफसर जाधव, बाळू पवार , आयुब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन अंगद देवकते यांनी केले. यात्रा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.