Homeराजकीयएकशे ऐंशी कोटी खर्चून केलेल्या महामार्गावर पडत आहेत खड्डे !

एकशे ऐंशी कोटी खर्चून केलेल्या महामार्गावर पडत आहेत खड्डे !

मुरूमाने खड्डे बुजवून बांधकाम विभागाचा प्रताप नेहमीच होतात त्या खड्ड्यात अपघात

जोमदार डेस्क/अविनाश जोशी (करमाळा) कोर्टी ते आवाटी राज्य महामार्ग क्रमांक ६८ या एकशे ऐंशी कोटी खर्चून तयार केलेल्या या महामार्गावर वर्षभरात भले मोठे खड्डे पडायला सुरवात झाली . महामार्ग असल्याने अचानक खड्डा आल्यानंतर वेगात असलेली वाहणे खड्ड्यात आदळून मोठे नुकसान होत आहे तर खड्डा चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर अपघात देखील घडले आहेत. पांडे येथील वळणांवर पडलेल्या खड्ड्यात पडून अपघात झालेले आहेत बांधकाम विभाग तसेच संबंधित एनपी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून डोळेझाक होत आहे. मुरूमाने खड्डे बुजवण्याचा प्रताप बांधकाम विभागाकडून करण्यात आला आहे. वाहणे जावून हा मुरूम पुन्हा रस्त्यावर उडून येत असल्याने धोकादायक परस्थीती निर्माण झाली आहे.

या रस्त्याचे काम सुरू असताना बांधकाम विभाग तसेच क्वालिटी कंट्रोल व देखरेख करण्यासाठी असलेले शासकीय अभियंते यांच्यात मिलीभगत झाल्याने या महामार्गच्या कामात कोट्यवधी रूपयाचा गैरव्यवहार झाला असल्यानेच या रस्त्यावर वर्षभरातच खड्डे पडायला सुरवात झाली .अनेक ठिकाणी हा रस्ता खचला होता त्यानंतर पुन्हा तेवढीच पट्टी उखडून दुरूस्त केली जात आहे. अनेक ठिकाणी चढउतार झाल्याने वेगात असलेल्या वाहनांचा ताबा सुटत असल्याने अनेक चारचाकी वाहने पलटी होवुन अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.

या रस्त्याचे काम निष्काळजी पने केल्याने रस्त्यावर खड्डे पडत आहेत. दोन महिन्यापासून या ठिकाणावर खड्डे आहेत या संदर्भात अनेक वेळा बांधकाम विभागास सुचना केल्या मात्र अत्यंत धोकादायक ठिकाणचे खड्डे बुजवायला वेळ भेटत नाही हे दुर्दैव आहे. अंकूश जाधव (माजी सरपंच शेलगाव)

एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काम अनेक वर्ष रेंगाळले होते .मुदत संपत आल्याने शेवटच्या काही दिवसात रात्रंदिवस काम करून काम उरकून घेतले . कोट्यवधी रूपय खर्चून होत असलेल्या महामार्गाचे काम करत आसताना क्वालिटी कंट्रोल, बांधकाम विभाग यांनी कामाच्या दर्जा कडे अर्थपुर्ण दुर्लक्ष केल्यानेच हा रस्ता लवकर खराब होत आहे.या रस्त्याच्या कामाच्या क्वालिटीची केंद्रीय समीती मार्फत चौकशी करणे गरजेचे आहे. शंभूराजे फरतडे (युवासेना तालुकाप्रमुख ठाकरे)

RELATED ARTICLES

Most Popular

Call Now Button