जोमदार डेस्क / अभिजित आपटे
मावळ : तळेगाव दाभाडे शहरातील करवाढी चा प्रश्न असो, शहर स्वच्छतेचा विषय असो, पाणीपुरवठ्याचा विषय असो, प्रशासनाच्या विरोधात जाऊन जनसामान्यांसाठी ठाम भूमिका घेणारे आणि निर्णय बदलायला लावणारे बापूसाहेब भेगडे मावळ विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत. सर्वपक्षीय पाठिंबा मिळवत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि प्रचाराची सुरुवात केली जनसामान्यांचा वाढता पाठिंबा सोशल मीडियावरची त्यांची उपस्थिती त्यांच्या लोकप्रियतेची चुणूक देते.
बापूसाहेब भेगडे यांचा संघर्ष मोठा आहे पण रामाच्या मदतीला जसा लक्ष्मण होता तसे बापूसाहेब भेगडे यांच्या मदतीला कणखरपणे ठामपणे उभे असणारे किशोर भाऊ भेगडे यांचं सुद्धा कर्तुत्व फार मोठा आहे कुठलाही तळागाळातला एखादा सर्वसामान्य व्यक्ती किशोर भाऊंकडे न्याय मागायला गेला आणि त्याला न्याय मिळाला नाही असं कधीही झालेलं नाही.
बापूसाहेब भेगडे यांना मांनणारा वर्ग केवळ तालुक्यातच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात बघायला मिळतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने आमचा नेता पावरफुल ही उक्ती त्यांच्या बाबतीत खरी ठरते.
मावळ तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रात संवेदनशील ओळखला जातो. पण या शब्दातच मावळ तालुक्याची ओळख लपलेली आहे आणि ती म्हणजे मावळच्या लोकांमध्ये संवेदना आहेत. संवेदना नसलेला शरीर हे मृत समजलं जातं आणि आमच्यात संवेदना आहेत म्हणजे आम्ही जिवंत आहोत. आणि म्हणूनच आम्ही संवेदनशील आहोत तसेच सृजनशील सुद्धा होत हे मावळ तालुका दाखवून देतो. आमदार कोणीही होवो मावळच्या शेतकऱ्यांचा महिला भगिनींचा तरुणांचा प्रश्न सुटला पाहिजे. मावळचा विकास झाला पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे बापूसाहेब भेगडे आमदार झाल्यावर मावळच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवतील आणि निवडणुकीचा हा रणसंग्राम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल आणि जय पराजय हे खेळाडू वृत्तीने स्वीकारले जातील.