Homeराजकीय"दिग्विजय बागल यांच्या करमाळा शहर मधील पदयात्रेला करमाळाकरांचा उस्फूर्त प्रतिसाद"

“दिग्विजय बागल यांच्या करमाळा शहर मधील पदयात्रेला करमाळाकरांचा उस्फूर्त प्रतिसाद”

जोमदार डेस्क/ अविनाश जोशी
करमाळा : शिवसेना व महायुतीचे करमाळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री दिग्विजय दिगंबरराव बागल यांनी काल रात्री करमाळा शहर मध्ये प्रचार पदयात्रा केली…
करमाळा शहर मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शहरातील अंतर्गत रस्ते, उपजिल्हा रुग्णालयाची दुरवस्था, शहरातील स्वच्छता या मूलभूत प्रश्नांकडे गेली दहा वर्षे करमाळा करांनी संधी दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याच लोकांनी भावना व्यक्त केल्या…

काल झालेल्या मा. मुख्यमंत्री महोदयांच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी करमाळा शहर पाणी प्रश्न, उपजिल्हा रुग्णालय व वैद्यकीय सेवा ह्या सोडविण्यासाठी आम्ही दिग्विजय बागल यांना पूर्ण ताकद देऊ असा विश्वास दिला होता त्यामुळे लोकांना आता माननीय मुख्यमंत्री, महायुती व दिग्विजय दिगंबरराव बागल व बागल कुटुंब यांच्याकडून आशा आहेत…

या पदयात्रेत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रश्मी दीदी बागल – कोलते, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, करमाळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किरण जी बोकण, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण, करमाळा नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक सचिन घोलप, विजय लावंड, संजय घोरपडे, ॲड. शिंगाडे, महायुतीचे पदाधिकारी व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते….

RELATED ARTICLES

Most Popular

Call Now Button