जोमदार डेस्क/ हेमंतकुमार केळकर
मावळ : अखेर बॅलेट मशीनची पहिली यादी जाहीर झाली आणि पहिल्या नंबर वर राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पार्टीचे उमेदवार आमदार सुनील आण्णा शेळके ठळकपणे दिसत आहेत. पण खाली मात्र सर्वच उमेदवार हे अनोळखी दिसतात.
आणि या अनोळखी उमेदवारांच्या गर्दीमध्ये स्थानिक उमेदवार हरवला आहे. पसंतीचा उमेदवार सापडत नाही त्यामुळे एकमेव उमेदवारावर लक्ष केंद्रित होतं आणि ते म्हणजे सुनील आण्णा शेळके ज्यांचं नाव बॅलेट मशीन वर प्रथम क्रमांकावर आहे.
मावळचं हे चक्रव्यूह बाकीचे उमेदवार भेदणार का? की अभिमन्यू प्रमाणे हरवले जाणार हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.
एकंदर काय तर मावळमध्ये सुनील आण्णा शेळके यांना आता प्रतिस्पर्धी उरलेला नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच सुनील आण्णा शेळके हे आमदार झाले आहेत फक्त घोषणा बाकी आहे अशी मावळच्या मतदारांमध्ये चर्चा आहे.