Home राजकीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारक्षम पिढी घडवणारे गुरुकुल – हिंदू राष्ट्र सेना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारक्षम पिढी घडवणारे गुरुकुल – हिंदू राष्ट्र सेना

0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारक्षम पिढी घडवणारे गुरुकुल – हिंदू राष्ट्र सेना

पुणे : पुजनीय केशव बळीराम हेडगेवार यांनी २७ सप्टेंबर १९२५ रोजी सुरू केलेलं संस्कारक्षम पिढी घडवणारे गुरुकुल आहे असे गौरवोद्गार हिंदू राष्ट्र सेना सचिव श्री अभिजीत आपटे यांनी काढले. हिंदू एकजूट करून हिंदू राष्ट्र घडवणे हा त्यामागचा उद्देश असला तरीही गावोगावी संघ शाखांच्या माध्यमातून आणि समर्पित संघ शिक्षक उभे करून संस्कारक्षम पिढी घडवण्याचं आणि राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्याचं कार्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांनी देशभर फिरून संघ देशभर पसरवला आणि याच गुरुकुल मधून घडलेले अनेक स्वयंसेवक देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. हीच संस्कारक्षम पिढी पुढे राजकारणात उतरली आणि राजकीय व्यासपीठावरून हिंदूंसाठी एक स्वतंत्र पर्याय उभा राहिला. आजही 21व्या शतकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभरातल्या आणि जगभरातल्या कोट्यावधी तरुणांना राष्ट्रकार्यासाठी सदैव सज्ज राहण्याची प्रेरणा देतो. आदरणीय मोहन भागवत यांनी संघाची परंपरा जपली आणि पुढे सुरू ठेवली आणि भीष्म पितामहां प्रमाणे संघ आणि संपूर्ण भारतीय समाजाला दिशा देण्याचे कार्य करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Call Now Button