कनिष्ठ अभियंताना पगारामध्ये 4 हजाराची पगार वाढ
जोमदार डेस्क / वसई विरार
वसई विरार शहर महानगरपालिकेतील ठेका कर्मचाऱ्यांना 20000 दिवाळी बोनस दिवाळीपूर्वी अदा तसेच कनिष्ठ अभियंताना पगारामध्ये 4 हजाराची पगार वाढ राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या पाठपुराव्याला यश
वसई विरार शहर महानगरपालिकेतील ठेका कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 20 हजार रुपये दिवाळी बोनस अदा करण्यात आला
तसेच मागील चार वर्षापासून कनिष्ठ अभियंतांच्या पगारात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती याबाबत सातत्याने राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने पाठपुरावा केला तसेच कामगार उपायुक्त पालघर यांच्याकडे बैठका लावून ही भरघोस पगार वाढ देण्यात राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ला यश आले आहे त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व कर्मचारी राष्ट्रवादी महाराष्ट्र युनियनचे आभार मानत आहेत
राजाराम भास्कर मुळीक उपाध्यक्ष राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन