जोमदार डेस्क / बापू वैद्य ज्येष्ठ पत्रकार डोंबिवली
राजकारणातील घराणेशाही ची किड नष्ट झाली पाहिजे,मग ती कोणत्याही पक्षातील असो.
घराणेशाही ने पक्षा निष्ठावंत कार्यकत्यांनी फक्त काय पक्ष मिटींगच्यावेळी सतरंज्या हातरणे व खुर्च्या माडणे हीच कामे जिवतोडून करायची काय ? त्यांच्या भावनिकदृष्ट्या आदर राखणे ही पक्षश्रेष्ठीची जबाबदारी आहे पण लक्षात कोण घेतो.कार्यकर्ते वाटत नसेल का आपल्याही कधीतरी निवडणूक लढवण्याची संधी मिळाली पाहिजे.पण तसे दुदैवाने म्हणावे लागते या निष्ठावंत सेवक मात्र सदैव डावले जाते.एकदा आमदार किंवा खासदार झाला की मग त्याच्या मुलाबाळांना,बायकोला भाऊ बहिण यायच्या शिवाय त्यांना सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते दिसत नाही.तसेच आयाराम गयाराम यांची बडदास्त व सरबराई ठेवण्यासाठी निष्ठावंत यांनी झटायचे काय.
निष्टावंताच्या जीवावर हे राजकीय नेते आमदार खासदार होतात हे ही राजकीय नेते लक्षात ठेवणे गरजेचे आहे.उद्या समजा कार्यकर्ते यांनी असहकार चळवळ उभी केली तर पक्षनेते काय करणार.
आपल्या देशात कायदा झाला पाहिजे की,
एकदा आमदार खासदार झाला की त्याला तीन टर्म झाल्यावर घरी बसवावे.घरी बसविल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना संधी उपलब्ध करून देण्यात येऊ नये.असे केले तरच निष्ठावंत कार्यकर्ते यांना संधी उपलब्ध होईल.
यासाठी कायदा करण्याची गरज आज नाही तर उद्या निर्माण होईल.ज्याप्रमाणे राष्ट्रपती पद हे फक्त पाच वर्षांचे असते त्याप्रमाणे आमदार खासदार हे ही पद पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ असता कामा नाही. यासाठी निष्ठावंत कार्यकर्ते यांनी मैदानात उतरून आंदोलन केले तर त्यांना न्याय मिळेल.