सेवा हवी की अरे रावी? निर्णय तुमचा
सुविधा हवीत की आश्वासनाच्या खिरापती? स्वतःची तरकी हवी की दुसऱ्याची उन्नती? आपणच ठरवा आणि भाषणे ऐकून किंवा आश्वासनाना भुलून न जाता बोलणारा उमेदवार, आणलेल्या योजना सुरु ठेऊन आपले भले करणारा आहे का, शासनातील नोकरभारती सुरु करणारा त्यासाठी भांडणारा,कामकारणारा हवा हे जनतेनीच ठरवायचे आहे. कारण आजचे राजकारण बघितले, आणि मतदान करणारे बघितले की, लक्षात येते हल्ली जेलमधून शिक्षा लागलेला देखील निवडणूक लढतो. निवडून आयोग देखील त्याला परवानगी देत. एवढेच नाही तर त्याला जनता मत देऊन निवडून पण देते. तो जेल मधून सरकार कसा चालवू शकतो? घटनेत याची तरतूद आहे का? असेल तर ती काय आहे? याचा विचार देखील कोणी करीत नाही.
राज्यपालांचा कोठा, पदवीधर, शिकक्षक विधानसभा, तसे आता जेल आमदार म्हणजे जेलमधील शिक्षा लागलेल्या कैद्यांचे, अंडर ट्रायल कैद्यांचे, प्रश्न मांडणारा आमदार ज्याला आपण जेल आमदार, जेल खासदार म्हणून शकतो. तो असणे येवढेच बाकी राहिले आहे. असे म्हणावे लागेल किंवा असे होणे बाकी राहिले आहे. कोण काय बोलला,कोणी कोणाची गळा भेट घेतली, कोणी कोणाला ठोकले कोणी कोणाला फोडले. कोण शिंकले हे वर्तमान पत्रातून, टीव्हीवर दिवसभर चार चार ओळी आलटून पालटून आपण बघत आहोत. आणि हे सर्व पाहिले की वाटते आपण बुद्धी विकत घेतोय की रद्दी?. डोक्यात बुद्धी साठवतोय की रद्दी?. असे प्रश्न उभे राहतात. आपल्याला काय वाटते नक्की सांगणे.
रसाच्या गुरळ्यावर जसे रसवला ऊस मशीन मध्ये टाकतो नंतर लिंबू मग आले वैगेरे एक एक वस्तू टाकून तोच ऊस चोथा होई पर्यंत मशीन मध्ये घालतो. त्या प्रमाणे सोशल मीडिया वरील गोष्टी, राजकारण्याचे बोलणे झाले आहे.
या राजकारण्यांनी जनतेचा रस काढून माया जमवली आहे. आणि त्यातूनच जनतेला देऊन उपकार केल्याचे दाखवत आहेत. जसा चोथा जाणवरांना देतात तसाच काहीसा प्रकार आहे. याचा विचार आता जनतेने केला पाहिजे एवढेच सांगणे आहे.
पत्रकारांचे नक्की काम काय असत !
पत्रकारांचे, संपादकांचे काम नक्की काय असत तर एका हाथात आरसा तर एका हाथात बटरी घेउन सर्वत्र फिरणे म्हणजे जिथे अंधार आहे तिथे टॉर्च दाखवणे आणि जिथे अहंम पणा आहे तिथे त्याला आरसा दाखवणे पण आजचे राजकारणी पुढारी कथाकथित सोशल वर्कर यांच्या सारख्या प्रस्थापिकान समोर पत्रकार उभे राहू शकत नसल्याने त्यांची पत्रकारिता रद्दी सारखी झाली आहे. पूर्वी रद्दीला देखील किंमत होती महिना अखेर त्यातून एखादे बिल तरी अदा व्होयचे पण आज रद्दीलाही किंमत राहिली नाही.
एक गोष्ट आठवली
पूर्वी बस स्टॅन्ड वर, रेल्वे स्टेशनला एटीएमसारखा त्यात गोलचक्र, त्यावर रंगीबेरंगी लाईट, असलेली मशीन,(वजनकाटा) नाण टाकलं की वजन यायचं त्या वजनाच्या सोबत येणाऱ्या कागदावर चार ओळी भविष्याच्या असायच्या. एकदा मी असाच त्यावजन काट्याकडे बघितले. आणि मला दिसले एक कुत्रा वजन काट्यावर बसला होता. आणि माझ्या मनात विचार आला आणि मी लगेच त्या वजन काट्याकडे गेलो. कत्र्याचे वजन बघण्याची मला इच्छा नव्हती. बघण्याची इच्छा होती ते त्याचं भविष्य. म्हणून मी कुत्र्याला न उठा उठवता दहा पैशांचे नाणे त्या मशीनमध्ये टाकले. नाणे मशीन मध्ये टाकताच आवाज झाला आणि लगेच तिकीट बाहेर आले. त्यावर लिहिलेलं भविष्य वाचून मला आश्चर्य वाटलं.
त्यात लिहिलं होत. आपने वाणी पे ताबा रखो फायदा होगा, आपकी शक्ती आपके दातोमे है. इस देश का भविष्य आपके हाथो मे है. आज पत्रकार याला बाईट म्हणतात जे आपण रेगुलर शब्दप्रयोग करत असतो आज राजकारणात आणि पत्रकारितेत असेच काहीसे झाले झाले आहे.
सतरंज्या, खुर्च्या उचलणाऱ्या लोकांकडे कोणत्याही पार्टीच्या नेत्यांचे लक्षच नाही. लक्ष आहे बलाढ्य लोकांकडे. हे सत्य पत्रकार दाखवतच नाहीत. बाईट मधील बोलणे दाखवले जाते. पण त्यामागील सत्य किंवा सामान्यांचे प्रश्न अनुत्तरित असतात. आणि म्हणून ते दाखवण्या जोगे नसतात.
हेमंतकुमार केळकर