जोमदार डेस्क /अविनाश जोशी
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल युवासेना व करमाळा तालुक्यातील गोरक्षक या सरकारने केलेल्या निर्णयाचा स्वागत केले
याप्रसंगी युवासेना ज़िल्हा समन्वयक निखिल चांदगुडे बोलताना म्हणाले की मुख्यामंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी संवेदनशीलता दाखवत गोशाळांना प्रतिदन ५०रु असे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे.
अशाप्रकारे प्रत्येक गोशाळांना वार्षिक १८००० रुपयांची मोठी मदत लाभणार आहे
यावेळी युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे ,विश्व हिंदू परिषद जिल्हा सह संयोजक ॲड. प्रियाल आगरवाल करमाळा गोरक्षक शहर प्रमुख करण अलाट संकेत दयाल संग्राम दयाल, रोहित गुरव तसेच आदी गोरक्षक उपस्थित होते…