Homeसामाजिककरमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक शेठ खाटेर यांना राज्यस्तरीय श्री कमलाई देवी...

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक शेठ खाटेर यांना राज्यस्तरीय श्री कमलाई देवी गौरव पुरस्कार प्रदान

जोमदार डेस्क/ अविनाश जोशी करमाळा:
करमाळा: करमाळा येथे श्री कमलादेवी माता नवरात्र उत्सवा निमित्त करमाळा फेस्टिवल चे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते त्या कार्यक्रमात 2024 चा श्री जगदंबा देवी बहू उद्देशीय संस्था व महप्रसाद वाटप मंडळ, अन्न छत्र मंडळ यांच्या वतीने राज्यस्तरीय श्री कमलाई देवी गौरव पुरस्कार करमाळा येथील तपश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर यांना त्यांनी आज पर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळेस संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे यांनी श्री खाटेर यांच्या आज पर्यंत केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे अन्न छत्र मंडळाचे सदस्य यांचे सह एस. वी. मॉल चे जयराज कदम, योगेश सोरटे, मा. सरपंच महेश सोरटे, मा. सरपंच राजेंद्र फलफले, अक्षय सोरटे, दीपक थोरबोले, बाळासाहेब नरारे सर,लष्कर सर,दत्ता रेगुडे, संतोष वारे, आशिष बोरा, चंद्रकांत कालदाते, विजय बरिदे यांचे सह रांगोळी स्पर्धेचे विजेते , डान्स स्पर्धेचे विजेते, यांचे सह त्यांचे सर्व पालक भाविक भक्त व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शेखर जोगळेकर यांनी केले

RELATED ARTICLES

Most Popular

Call Now Button