Home धार्मिक करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा येथे श्री शारदादेवी प्रतिष्ठापना व पूजा संपन्न

करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा येथे श्री शारदादेवी प्रतिष्ठापना व पूजा संपन्न

0
करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा येथे श्री शारदादेवी प्रतिष्ठापना व पूजा संपन्न

जोमदार डेस्क /अविनाश जोशी करमाळा : करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा येथे श्री शारदादेवी प्रतिष्ठापना व पूजा संपन्न घटस्थापनेचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था करमाळा संचलित श्री कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा येथे शारदोत्सव मिरवणूक शहरातील मुख्य चौकातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली यावेळी मिरवणूक पाहण्यासाठी ठिकठिकाणी नागरिक व पालकांनी गर्दी केली होती विद्यार्थिनींनी देवीच्या विविध संगीतावर लेझीम चे मनमोहक प्रात्यक्षिक केले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्रोत्सवात शारदा देवीची मिरवणूक मोठ्या गजरात करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली विद्यार्थिनींचे विविध प्रात्यक्षिके व कार्यक्रम आयोजित करण्यात आले मिरवणुकीनंतर श्री शारदा देवी मातेची प्रतिष्ठापना व पूजा करमाळ्याच्या तहसीलदार सौ शिल्पा ठोकडे मॅडम यांच्या हस्ते पार पडली यावेळी देवीचे स्वरूप असलेल्या कुमारीका यांची देखील पूजा संपन्न झाली. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था करमाळा संचालक मंडळ श्री गणेश चिवटे, श्री शाम पुराणिक, श्री सुनिल सूर्यपुजारी, श्री महेश परदेशी, श्री प्रविण गायकवाड तसेच माजी नगरसेविका सौ स्वाती फंड भाजपाचे श्री रामभाऊ ढाणे श्री अमोल पवार उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ मुक्ता शेलार मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Call Now Button